आसू येथून अमर गुंजवटे बेपत्ता


दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
आसू (पवारवाडी, ता. फलटण) येथील चालक असलेला अमर महादेव गुंजवटे (वय २६) हा युवक २० नोव्हेंबरच्या दुपारी ४.३० वाजल्यापासून मोटारसायकलवरून आसू येथून बेपत्ता झाला असल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

अमर गुंजवटे हा रंगाने गोरा, अंगाने मजबूत, उंची पाच फूट, चेहरा गोल, अंगात पिवळ्या रंगाची जर्किंग पॅन्ट, निळे जीन्स, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे, शिक्षण दहावी, मराठी भाषा बोलतो.

या घटनेचा तपस पोलीस नाईक अभंग करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!