
दैनिक स्थैर्य । 25 मार्च 2025। फलटण । जिंती येथील श्री जितोबा विद्यालयातील 1982-83 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सकाळी नऊ वाजता सनई ताफ्याने वादनात गुरु शिष्यांच्या मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने 43 वर्षांनी गुरु शिष्यांच्या संवाद घडून आला. या स्नेहमेळाव्यात शाळेच्या अडीअडचणी समजावून घेऊन वर्गामित्रांच्या सहकार्याने शाळेला आर्थिक मदत करण्याचे यावेळी ठरले.
कार्यक्रमात विज्ञान शिक्षक व्ही.बी. शिंदे, डी .बी. साबळे, गणित शिक्षक बबनराव काळोखे धुमाळ कृषी अधिकारी यांनी पुढील आयुष्य कसे जगावे याकरता कानमंत्र दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन संभाजी ढेंबरे, भरत रणवरे, विश्वास भोसले, रामभाऊ रणवरे दत्तात्रय शिंदे, राजकुमार रणवरे यांनी स्थानिक कमिटीच्या सहकार्याने केले होते. यावेळी मुख्याध्यापक सौ. जाधव व सर्व शिक्षक सहकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रभाकर काटे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास भोसले यांनी आभार मानले.