दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास देशातील वेग-वेगळ्या भागातून व परदेशातून सुमारे 300 विद्यार्थी उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने बरेचशे माजी विद्यार्थी एक दिवस अगोदर महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी संगणकशास्त्र विभागातील आजी विद्यार्थ्यांना विविध आय.टी. कंपन्यामध्ये चालणारे काम व नौकरीच्या संधी यावर वेगवेगळी व्याख्याने दिली. विविध वर्गात दिवसभर चाललेल्या या व्याखानमालेत 20 माजी विद्यार्थ्यांनी सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस खूप फायदा होणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी संगणक शास्त्र विभागास प्लेसमेंट विषयी तसेच गेस्ट लेकचर विषयी सर्वोतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.
संगणक शास्त्र विभागातील माजी विद्यार्थी Amezon, Tata Elexi, Thought Works, Capgemini, Zensor, Infosys, Wipro, L&T, TCS अश्या अनेक कंपन्यांमध्ये प्रोग्रामर पासून ते व्यवस्थापक पदापर्यंत कार्यरत आहेत.
विभागाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टार्ट अप्स सुरु केले असून त्यांची वार्षिक उलाढाल 50 ते 100 कोटी पर्यंत आहे. विभागात गेल्या 24 वर्षापासून दोन हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संगणक शास्त्र शिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत असंख्य टाळ्यांच्या कडकडाटात व पुष्पवृष्टीने झाले. यासाठी विद्यार्थ्यांनी ऱेड कार्पेट अंथरली होती. या कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनामुळे सर्व माजी विद्यार्थी भारावून गेले होते. या कार्यक्रमास महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उप प्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भगवान चौधर, उपाध्यक्ष तावरे, सचिव नितीन सातव, टी.पी. ओ. विशाल कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थी कोमल निंबाळकर आणि सहदेव गाढवे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख गजानन जोशी यांनी केले. श्री भगवान चौधर यांनी माजी विद्यार्थी संघटनेच्या मार्फत केलेल्या कामाचा आढावा घेतला. हा मेळावा दर वर्षी घेण्यात यावा आणि सर्व विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
या नंतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना संगणक शास्त्र विभागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आणि विभागाचे भरभरून कौतुक केले. महाविद्यालाचे उप प्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद यांनी विभागाच्या सांघिक कामाबद्दल कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. भरत शिंदे यांनी हा मेळावा महाविद्यालाकरिता एक पथदर्शी कार्यक्रम ठरावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता अपार कष्ट घेतल्या बद्दल माजी विद्यार्थी संजय देवगुंडे व माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव श्री. नितीन सातव यांचे कौतुक केले. आणि असे अनेक संजय विभागातून निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 2003 चा माजी विद्यार्थी श्री. उदय शेलार हा त्याची एक अवघड शस्त्रक्रिया झालेली असताना केवळ विभागाच्या प्रेमापोटी कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल प्रा. ढाणे सरांनी त्याचे पुष्प गुच्छ देवून कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांनी त्यांना शिकविलेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन माजी विद्यार्थी आणि शब्दधन फ़ौंडेशन चे संचालक श्री मनोज वाबळे यांनी केले तर आभार डॉ. जगदीश सांगवीकर यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. गौतम कुदळे, प्रा. सविता निकाळे, डॉ. मंगेश कोळपकर , प्रा. महेश पवार, प्रा. मंगल माळशिकारे, प्रा. विजयराव काकडे, डॉ. संजय खिलारे, प्रा. मेघना देशपांडे, प्रा. गंगाराम वाबळे, आणि संगणकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक, बी.सी.ए. (विज्ञान) व बी.बी.ए. (सी.ए.) विभागातील प्राध्यापक हे उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांसाठी पार्किंग चे नियोजन, केलेले स्वागत, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था, विभागाची सजावट, सेल्फी पॉईंट हि आकर्षणाची केंद्रं ठरली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. नीता नांदगुडे, प्रा. क्रांती सपकळ, प्रा. रमा रोडे, प्रा. सारिका खेत्रे, प्रा. तृप्ती कदम, प्रा. रवी जुन्नरकर, प्रा. गौरी खराडे, प्रा. कल्पना भोसले, प्रा. गायत्री भिसे, प्रा. श्रद्धा ननावरे, प्रा. प्रियांका साळुंखे, प्रा. राजश्री शेळके, प्रा. अनिल काळोखे, प्रा. श्रद्धा जाधव, प्रा. पूजा कदम, प्रा. मनीषा भोसले, प्रा. सल्मा शेख, प्रा. गणेश वाळके, प्रा. महानवर यांनी खूप कष्ट घेतले.