दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय फलटण व मुधोजी महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळ फलटण यांच्यातर्फे आयोजित माजी विद्यार्थी मेळावा शनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘मल्टीपर्पज हॉल’, फलटण येथे संपन्न होत आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण, शिरीषशेठ दोशी, हेमंत रानडे, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. शांताराम गायकवाड, प्रा. चंद्रकांत पाटील, पत्रकार अरविंद मेहता, प्राचार्य अरविंद निकम, प्रा. प्रदीप रत्नपारखे तसेच माजी विद्यार्थी फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्राचार्य विश्वासराव देशमुख, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी विद्यार्थी मंडळाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, बालेवाडी क्रीडा संकुलाचे उपसंचालक अनिल चोरमले, कृ.उ.बाजार समिती मुंबईचे माजी चेअरमन डॉ. विजयराव बोरावके, मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पंढरीनाथ कदम, उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय दीक्षित, उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक यांनी केले आहे.