दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे व जिल्हा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासोबतच आहे; हे पुन्हा एकदा जिल्ह्याने सिद्ध केले आहे. लवकरच सातारा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात येईल, असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
कोल्हापूर येथे झालेल्या सभेला सातारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परिश्रम सुद्धा कार्यकर्त्यांनी घेतले आहेत. येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची भव्य – दिव्य सभा ही सातारा येथे आयोजित करण्यात येईल; असे ही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.