दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२१ । मुंबई । ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा आहे अशी माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
नवी मुंबईतील तलाव कांदळवन म्हणून घोषित केल्याने मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत आमदार रमेशदादा पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री.भरणे म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील १४७१ हेक्टर कांदळवन क्षेत्र शासनाने राखीव वन म्हणून अधिसूचीत केले आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या व्यवस्थापन आराखड्यामध्ये खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छिमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत बैठक घेवून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची माहिती श्री.भरणे यांनी यावेळी दिली.