स्थैर्य, सातारा, दि. ०५ : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करूनही कोविड नियमांचे उल्लंघन सुरुच होते. त्यामुळे पोलीस दलाने जिल्ह्यात ४ मे ला ऑलआऊट ऑपरेशन राबविले. या ऑपरेशनमध्ये ७३ चारचाकी व ४३८ दुचाकी वाहने ताब्यात घेतली. तसेच १३ चारचाकी वाहने व २०० दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती अशी, कोविड -१ ९ या विषाणूच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन ही मोहिम राबविली असून शासनाच्या या आदेशाच्या अनुशंगाने जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी २२ एप्रिल पासून वेळोवेळी क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ प्रमाणे निर्बंध जारी केलेले आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने संपुर्ण सातारा जिल्हयात दिनांक ४ मे रोजी ऑलआऊट ऑपरेशन राबविले.
या ऑपरेशनमध्ये ७३ चारचाकी वाहने व ४३८ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत . तसेच १३ चारचाकी वाहने व २०० दुचाकी वाहने जप्त करण्यात आली
विनामास्क फिरणारे विरुध्द २८८ केसेस करुन ६१,१०० रुपये दंड वसुल करण्यात आला. सोशल डिस्टन्सींग न पाळणारे दुकानदारा विरुद्ध विरुध्द ९ केसेस करुन ६,००० रुपये दंड वसुल करण्यात आला. तसेच या दरम्यान वाहनावरुन विनाकारण फिरणाऱ्या विरुद्ध मोटार वाहन कायदयांतर्गत ३६७ केसेस करुन ८२,१०० / – रुपये दंड वसुल करण्यात आला.
या ऑलआऊट ऑपरेशनसाठी सातारा जिल्हयात एकूण १३२ पॉईंट नेमलेले होते. याकामी ६६ पोलीस अधिकारी , ४८९ पोलीस अंमलदार व ३८२ होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.