कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा परीक्षेसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण – निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि.२०: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पुर्व परिक्षा 2020 दिनांक 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतू राज्यात वाढता कोरोना विषाणुंचा प्रदुर्भाव पाहता शासनाकडून खबरदारी म्हणून सदरची परिक्षा दिनांक 21 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी कोरोनाच्या विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेऊन परीक्षा घेतली जाईल तसेच सर्व ती खबरदारी घेवून परिक्षेची तयारी पुर्ण झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा केंद्रावरती एकूण 36 केंद्रावर एकूण 14827 उमेदवार राज्य सेवा पुर्व परिक्षा 2020 साठी बसलेले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून 36 केंद्रावर 36 केंद्रप्रमुख, 198 पर्यवेक्षक, 712 समवेक्षक, 96 मतदनीस लिपिक, 270 शिपाई कर्मचारी व 36 वाहनचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यसेवा पुर्व परिक्षा 2020 घेण्यात येणाऱ्या केंद्रांची (शाळा/महाविद्यालयांची नावे)नावे पुढीलप्रमाणे.

सातारा- अभयसिंह राजे भोसले इन्स्टिीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शाहुनगर शेंद्रे, आण्‌णासाहेब कल्याणी हायस्कूल सदरबझार, लालबहादूर शास्त्री कॉलेज, अनंत इंग्लिश स्कूल मंगळवार पेठ, कन्या शाळा 1155 अ/अ भवानी पेठ, महाराजा सयाजीराव विद्यालय ॲण्‌ड ज्युनिअर कॉलेज कर्मवीर समाधी परिसर, न्यू इंग्लिश स्कूल सोमवार पेठ (भाग-अ), न्यू इंग्लिश स्कूल सोमवार पेठ (भाग-ब), यशोदा टेकनिकल कॅम्पस फॅक्लटी ऑफ इंजिनिअरींग राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जवळ वाढे फाटा, यशवंतराव चव्हाण इन्स्टिीट्यूट ऑफ सायन्स सदरबझार कॅम्प (भाग-अ), यशवंतराव चव्हाण इन्स्टिीट्यूट ऑफ सायन्स सदरबझार कॅम्प (भाग-ब), पोदार इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे नं 43 प्लॉट नं. 1 व 2 पंडीत पार्क तामजाईनगर करंजे पेठ, अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पानमळेवाडी पो. वर्ये, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेकनिक पानमळेवाडी, पो.वर्ये, धनंजयराव गाडगीळ कॉमर्स कॉलेज सदरबझार, छत्रपती शाहु ॲकॅडमी ॲण्‌ड ज्युनिअर कॉलेज 19/20 अ, विसावा नाका, भारत विद्यामंदिर संभाजीनगर कोडोली एमआयडीसी, भवानी विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज 17 मल्हार पेठ, कला व वाणिज्य महाविद्यालय 117 अ/1,2,3 कोटेश्वर मैदानसमोर शुक्रवार पेठ, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आरटीओ ऑफिसजवळ सदरबझार, श्रीपतराव पाटील हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज करंजे पेठ, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर, कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका, छत्रपती शिवाजी कॉलेज सदरबझार, सातारा. कोरेगाव मध्ये दि मॉडर्न इंग्लिश स्कूल, डी. पी. भोसले कॉलेज. कराड मध्ये शासकीय तंत्रनिकेतन विद्यानगर, सदगुरु गाडगे महाराज कॉलेज विद्यानगर (भाग-अ), सदगुरु गाडगे महाराज कॉलेज विद्यानगर (भाग-ब), सेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला 483 मंगळवार पेठ, टिळक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्लॉट नं. 222 मंगळवार पेठ, यशवंत हायस्कूल, विठामाता विद्यालय ॲण्ड ज्युनिअर कॉलेज 303 बुधवार पेठ, श्री. शिवाजी विद्यालय 313, बुधवार पेठ. वाई मध्ये कन्या शाळा, महर्षि कर्वे रोड, मधली आळी, द्रविड हायस्कूल सोनगिरवाडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, ब्राम्हणशाही.

परिक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट करणेत आली आहे. उमेदवारांनी आयोगाकडून प्राप्त झालेले परिक्षा प्रवेशपत्र सोबत घेवून येणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांनी परिक्षा उपकेंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!