दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । फलटण । शालेय जीवनामध्ये असताना विद्यार्थ्यांचा हा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ हे महत्वाचे असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्याने राष्ट्राचा विकास होतो, त्यामुळे शालेय जीवनात असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, असे मत गुरुकुल कॉम्पुटरचे भरतेश राव यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुकुल कॉम्पुटरचे भरतेश राव यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी दहा हजार रुपये किमतीचे खेळाचे ड्रेस भेट म्हणून दिले. यावेळी राव बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अश्विनी रुपनवर, उपाध्यक्ष शकील सय्यद, माजी अध्यक्ष रोहिदास पिसाळ, सदस्य सतेश कारंडे, सचिन तरडे, सदस्या सौ. कविता तरडे, सौ. रेश्मा टकले, शिक्षक केशव माने, सागर भंडलकर, गडकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गुरुकुल कॉम्पुटरचे भरतेश राव यांनी सर्व मुलांसाठी खाऊ वाटप व संस्कार पुस्तकांचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन बोबडे यांनी मानले.
यावेळी विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.