सातार्‍यात रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा


स्थैर्य, 30 जानेवारी, सातारा : उपमुख्यमंत्री (कै.)अजित पवार यांना जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी (ता. 1 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार नितीन पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, नागरिक यांची सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे. या सभेस सर्वपक्षीय आजी, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!