स्थैर्य, फलटण, दि. ०२ : सध्या फलटण शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. फलटण शहरामध्ये सुमारे एक हजार ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी संपूर्ण फलटण शहर हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्या मुळे फलटण शहरातील असणारे सर्व व्यवहार हे बंद राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हि फलटण शहरच्या हद्दीत असल्याने फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील रविवारी असणारे भुसार मार्केट व मंगळवारी असणारे कांदा मार्केट बंद राहणार आहे. परंतु फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी फळे व भाजीपाला मार्केट हे सुरु राहणार आहे, अशी माहिती फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली.