
दैनिक स्थैर्य | दि. १३ डिसेंबर २०२४ | फलटण |
आखिल भारतीय महानुभाव परिषद ही राजकीय क्षेत्रात काम करत नाही. या परिषदेचा आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. महानुभव परिषद ही धार्मिक कार्य आणि व्यसनमुक्तीचे कार्य करते. त्यामुळे या परिषदेचा कोणताही सदस्य मोर्चात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन आखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री श्यामसुंदर शास्त्री विध्वंस यांनी केले आहे.
ईव्हीएमविरोधातील मोर्चात आखिल भारतीय महानुभाव परिषद सहभागी होणार असल्याचे वृत्त नाशिक येथे प्रसिध्द झाल्यानंतर याबाबत विचारले असता महंत श्यामसुंदर शास्त्री विध्वंस यांनी वरील विधान केले आहे.
नाशिक येथील एका महानुभवाने वृत्तवाहिनीवर बोलताना ही परिषद ईव्हीएमविरोधातील मोर्चात सहभागी होणार असल्याचे म्हटले होते. याबाबत महंत श्यामसुंदर शास्त्री विध्वंस म्हणाले की, वृत्तवाहिनीवर वक्तव्य केलेले महानुभाव हे आखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ५१ सदस्यांमध्ये नाहीत. त्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य असल्याचे श्यामसुंदर शास्त्री विध्वंस यांनी म्हटले आहे.