
दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय सातारा येथे सोमवार दि. 10 ऑक्टोबर रोजी मोफत जिल्हास्तरीय सर्व रोग वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये कान, नाक, घसा, स्त्रीरोग, अस्थिरोग, कर्करोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, नेत्र व इतर तपासणी होणार आहे. या आरोग्य शिबीरामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत दिल्या जातील. तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी केले आहे.