
दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। फलटण । आळजापूर येथील निलेश जगताप या तरुणावर एका डेअरी मालकाने राजकीय सुडबुध्दीतून कारवाई केली. या अन्यायाविरुद्व ग्रामस्थ व महिलावर्ग यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. निलेश जगताप या तरुणावर एका डेअरी मालकाने राजकीय संबंधाचा गैरवापर करून लोणंद पोलीस स्टेशन येथे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती युवा नेते ऋतुराज नलवडे यांनी दिली.
निलेश जगताप व त्याच्या कुटुंबा वरती झालेल्या अन्याया विरुद्ध आज आळजापूरकरांनी एकजुटीने आवाज उठवलेला आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय सातारा याठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते ऋतुराज नलवडे यांनी दिली.