आळजापूरकरांसाठी ‘शुभेच्छां’ची नवी सुरुवात! शुभम नलावडेंच्या संकल्पनेतून ‘दिनदर्शिका २०२६’चे दिमाखदार प्रकाशन; दिग्गजांची मांदियाळी


सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष शुभम नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या २०२६ च्या दिनदर्शिकेचे आळजापूर येथे संतकृपा समूहाचे विलासराव नलवडे आणि सरपंच पुष्पा पवार यांच्या हस्ते उत्साहात प्रकाशन करण्यात आले.

स्थैर्य, आळजापूर, दि. ०३ जानेवारी : सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष आणि आळजापूर गावचे माजी युवा सरपंच श्री. शुभम बाळासाहेब नलावडे यांच्या कल्पकतेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिनदर्शिका २०२६’ चा प्रकाशन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. आळजापूर गावातील सामाजिक ऐक्य आणि विकासाचा ध्यास दर्शवणारा हा उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

या प्रकाशन सोहळ्यासाठी संतकृपा उद्योग समूहाचे संस्थापक श्री. विलासराव नलवडे आणि गावच्या विद्यमान सरपंच सौ. पुष्पा चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या शुभहस्ते आणि गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक व युवा वर्गाच्या साक्षीने २०२६ च्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. शुभम नलावडे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून गावासोबतची नाळ अधिक घट्ट केली असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये श्री. सुरेश जगताप, श्री. रामदास फडतरे, उपसरपंच सौ. गीतांजली नलवडे, सौ. प्राजक्ता नलवडे, ज्येष्ठ नागरिक श्री. चंद्रकांत पवार, व्हाईस चेअरमन श्री. अरुण काकडे, तसेच संचालक श्री. प्रकाश शिंदे, श्री. महिंद्र नलवडे, श्री. खाशाबा मोठे, श्री. चंद्रकांत शिंदे, श्री. विजय शिंदे, श्री. जगन काकडे, श्री. बाळकृष्ण मसुगडे, श्री. सागर काकडे आणि श्री. सागर नलवडे यांची उपस्थिती होती.

तसेच माजी सदस्य श्री. अमोल शिंदे, श्री. सूरज मसुगडे, श्री. सुहास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुनील पवार, श्री. अमर नलवडे, श्री. अक्षय नलवडे, ऋषी मसुगडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी श्री. मोहन मसुगडे यांच्यासह गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!