अक्षय्य तृतीयेला ५० वर्षांनंतर येणार ‘हा’ योग; लक्ष्मी कृपा प्राप्तीसाठी चांगला दिवस!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । औंध । साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुल्क पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवसी हा सण येतो. या वर्षी ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. तृतीया तिथी मंगळवार, ३ मे २०२२ रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होईल आणि ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहील. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते, त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे.

यंदा अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्र, शोभन योग, तैतिल करण आणि वृषभ राशीतील चंद्रासोबत येत आहे. मंगळवार आणि रोहिणी नक्षत्रामुळे या दिवशी मंगळ रोहिणी योग तयार होत आहे. शोभन योगामुळे या दिवसाचे महत्त्व वाढलं आहे. यासह पाच दशकांनंतर ग्रहांचे विशेष योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेला संपत्ती आणि समृद्धी कारक ग्रह शुक्र आणि कार्यसिद्धी देणारा चंद्र ग्रह आपल्या उच्च राशीत असणार आहेत. हा एक अत्यंत शुभ दुर्मिळ योग आहे.

त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने, दागिने, वाहन किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्याने तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढेल. चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय्य तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्ये तुम्हाला अनेक पटींनी शुभ परिणाम देतील.

अक्षय्य तृतीयेला न विसरता कुलस्वामिनीची सेवा करावी.


Back to top button
Don`t copy text!