स्थैर्य, दहिवडी, दि.१७: माण तालुक्यातील बिजवडी गावातून आपल्या अध्यात्मिक अभ्यासाच्या जोरावर कीर्तन सेवेतून साता समुद्रापार पोहोचलेले कीर्तन कार अक्षय महाराज भोसले यांनी सामाजिक सेवेतून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना काळातील ह भ प अक्षय महाराज यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
महा एन जी ओ फेडरेशन चे संचालक वारकरी संप्रदाय युवा मंच चे अध्यक्ष असलेल्या भोसले महाराजांना काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडिया वर एक रात्रीची पोस्ट केली होती डॉ.विलास पवार यांना प्लाजमा उपलब्धीची आवश्यकता होती, त्यावेळी श्री. नितीनजी बालगुडे , तडवळे , जि. सातारा यांनी पुणे येथे येऊन प्लाजमा उपलब्ध करुन दिला.तसेच महाएनजीओ फेडरेशन व वेगा हेल्मेटस यांच्यावतीने पुणे येथील पीएमटी बस चालक , वाहक व अग्निशमन दल व समाजाच्या सेवेत सतत असणाऱ्या कर्मचारी वर्गाला १५०० वेगा फेस हेल्मेट देण्यात आले . एक हेल्मेट साधारण ५०० रु. किंमतीचे होते .महाएनजीओ फेडरेशन व आर्ट ऑफ लिविंगतर्फे अमरावती येथे १५ अंध व्यक्तींना किराणा किट सुपूर्द करण्यात आले.
त्यानंतर पुणे येथील कोविड रुग्णालयास महाएनजीओ फेडरेशन कडून ७०० पीपीई किट उपलब्ध करुन दिल्या .या प्रसंगी पुण्याचे महापौर श्रीमुरलीधर मोहळ , मा.शेखरजी मुंदडा उपस्थित होते. अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा त्यांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या फेडरेशन, वारकरी संप्रदाय व अक्षय वारी च्या माध्यमातून भोसले महाराज यांनी आळंदी ते पंढरपूर माऊली च्या पालखी सोबत सर्व घडामोडी ची माहिती देत असतात.
भोसले महाराज यांच्या बाबतीत अगदी कालचे उदाहरण म्हणजे बुधवार दि 14 रोजी रात्री दीड वाजता त्यांना एका व्यक्तीचा फोन आला की ” फलटण बाणगंगा ” नदी पुलावर पाणी खूप होत म्हणून थांबलो मात्र चुकून वायपर सुरु राहिला गाडीची बॅटरी डाऊन झाली आहे . रात्री घाटात प्रचंड पाऊस , धुकं व सोसाट्याचा वारा होता अशा वेळी सुद्धा भोसले महाराजांनी तिथं जावून मदत केली. अशा या अध्यात्मिक सेवे बरोबर सामाजिक सेवा करणाऱ्या भोसले महाराजांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जीवनात असा एक तरी मित्र जोडा जो काळ वेळ न पाहता मदतीस येईल . व त्याला ही विश्वास असेल की ही व्यक्ती फोन केला तर नक्की मदतीला येईल .वेळीच गरज भागवण्यापूरते कामापूरते जवळ येणाऱ्यांच्या त्याग करा.
– ह भ प अक्षय महाराज भोसले.