दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | बारामती |
बारामती शहरातील देसाई इस्टेट येथील अक्षय ज्ञानदेव घुले यांनी पोलीस उपनिरिक्षक पदाला गवसणी घालून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
अक्षय यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा कॉलेजमधून आय. टी. इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून त्यांनी एमपीएससीतून उपनिरीक्षकपदाची तयारी करून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या जोरावर हे यश मिळवले आहे.
राज्यात २८ वा येण्याचा मान…
एमपीएससी व यूपीएससीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी संयम राखणे महत्त्वाचे आहे. अनेकदा पेपरच्या तारखा पुढे मागे होत असतात, त्यामुळे खचून न जाता संयम राखून मेहनत घेत अभ्यास केला की यश नक्की मिळते. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. माझे मनाशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले, अशी भावना अक्षय घुले यांनी व्यक्त केली आहे.