प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ला कै.भास्करराव माने स्मृतीप्रीत्यर्थ ’अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार ‘

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘’संविधांनाच्या स्वप्नातलं गाव’ या कवितासंग्रहास सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने भास्करराव माने यांचे स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रविंद्र भारती -झुटिंग यांनी २०२१ अक्षर गौरव पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत.त्यानुसार ‘ नोटबंदी’ हा दि.बा.पाटील यांचा कथासंग्रह व आदिवासींचेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या संशोधनपर ग्रंथास ‘अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१’ जाहीर झाला आहे. प्रत्येकी २५०० रुपये व स्मृतीचिन्ह असे याचे स्वरूप आहे. या पुरस्काराबरोबरच’अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार’ जाहीर झाले असून उद्धव कांनडे व पुरुषोत्तम फुले यांनी संपादित केलेल्या ‘कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ’ या संग्रहास,वात्सल्यसुक्त या प्रकाश जडे यांच्या कविता संग्रहास व राजन लाखे लिखित गुंता या ललित लेख संग्रहास हे विशेष पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्येकी १००० रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा जिल्ह्यातील लेखकासाठी देण्यात येणाऱ्या’अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार’ यामध्ये प्रा.डॉ,सुभाष वाघमारे यांचा ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ हा कवितासंग्रह ,राजेंद्र वाकडे लिखित प्रवासवर्णन ‘भूतान एक
आनंदयात्रा’ व मनीषा शिरटावले यांचा’मन सांधते आभाळ’ या या कविता संग्रहाचा समावेश असून प्रत्येकी ५०० रुपये व सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. तसेच डॉ.श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ दिला जाणारा अक्षर गौरव २०२२ हा पुरस्कार दीपक प्रभावळकर यांच्या कोविडायन डायरी ऑफ पेंड्यामिक’या ग्रंथास जाहीर झाला असून रुपये १००० व स्मृतीचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे.सदर पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष साहित्यिका सौ.सुनिताराजे पवार यांचे उपस्थितीत २१ ऑगस्ट२०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सातारयात राजवाडा परिसरातील पाठक हॉल येथे होणार आहे. सदर पुरस्कारासाठी आलेल्या विविध कलाकृतींचे परीक्षण साहित्यिक डॉ.राजेंद्र माने,सचिन प्रभुणे व कांता भोसले यांनी केले. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ या कवितासंग्रहास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर, ८९ व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील,रयत शिक्षण
संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, साहित्यिकगुरुवर्य प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार वावरे,उपप्राचार्य डॉ.रोशनआरा शेख,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे प्रा.डॉ.रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश दुकळे, शिविमचे माजी अध्यक्ष,डॉ.शिवकुमार सोनाळकर,प्राचार्य डॉ.जी.पी.माळी यांनी अभिनंदन केले. अलीकडे 5 जून २०२१ रोजी त्यांच्या संविधानाच्या स्वप्नातलं गाव या कवितासंग्रहाचे प्रकाशन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते झाले होते. या कविता संग्रहास वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय समाज प्रबोधन पुरस्कार,छत्रपती शिवाजी कॉलेजचा सर्जनशील साहित्य लेखन पुरस्कार,तसेच गारगोटी येथील न्यूज पेपर गंगाधर पुरस्कार, तसेच तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार, शब्दकळा साहित्य संघ मंगळवेढा यांचा काव्य पुरस्कार,श्रीरामपूर येथील प्रकाश किरण पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा ललित साहित्य पुरस्कार, फलटण येथील उत्कृष्ट साहित्यसेवा पुरस्कार,सृष्टी साहित्य पुरस्कार अकोला ,वामनदादा कर्डक राष्ट्रीय पुरस्कार, स्वातंत्र्यसैनिक आबक पुरस्कार,हे अकरा पुरस्कार मिळाले असून हा अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यविश्व प्रकाशनचे प्रकाशक विक्रम शिंदे,डॉ.संजयकुमार सरगडे, तारुण्यवेध संघटनेचे विशाल पोखरकर, छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ, समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते, भीमराव मोरे, तुकाराम लोखंडे, शिवाजी वाघमारे, डॉ.गोरख बनसोडे, फर्गुसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार, भिनवाडा कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे, प्रा.युवराज खरात,तुषार बोकेफोडे, रोहित आवळे, प्रा.डॉ.आर.ए.कुंभार सम्यक शाक्यरत्न,मळोली गावातील हितचिंतक ग्रामस्थ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते,लुंबिनी संघ सातारा, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर,शिक्षक हितकारणी संघटना पुणे, तसेच अनेक साहित्यिक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!