अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे आज विद्यार्थी गुणगौरव समारंभ


दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्यातर्फे आज, शनिवार, दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ, फलटण येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीपाद विभूते, प्रमुख पाहुणे म्हणून सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल, फलटणच्या प्राचार्य श्रीमती अनुराधा आळतेकर यांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी व कार्यवाह सुभाष सबनीस यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!