घाडगेवाडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२४ | फलटण |
श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त घाडगेवाडी, ता. फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शनिवार, दि. २७/०७/२०२४ ते शनिवार दिनांक ०३/०८/२०२४ अखेर संपन्न होणार आहे. या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमांमध्ये अखंड वीणा व हरिनाम पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ७ ते ११ व दुपारी २ ते ५ सामुहिक ज्ञानेश्वरी वाचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, असे कार्यक्रम होणार आहेत.

या सप्ताहात शनिवार दिनांक २७/०७/२०२४ रोजी ह.भ.प. डॉ. योगेशकुमार नाळे (विडणी), रविवार दिनांक २८/०७/२०२४ रोजी ह.भ.प. आंबा महाराज मोहीते (मुळीकवाडी), सोमवार दिनांक २९/२०२४ ह.भ.प. रामदास महाराज जगताप (वाठार नि.), मंगळवार दिनांक ३०/०७/२०२४ ह.भ.प. संतोष महाराज जाधव (पाडळी, ता. खंडाळा), बुधवार दिनांक ३१/०७/२०२४ ह.भ.प. दिपक महाराज भोईटे (आळंदी), गुरुवार ०१/०८/२०२४ ह.भ.प. विष्णूबुवा महाराज टेंभूकर (पंढरपूर), शुक्रवार दिनांक ०२/०८/२०२४ ह.भ.प. दत्तात्रय महाराज फरांदे (निंबूत), शनिवार दिनांक ०३/०८/२०२४ ह.भ.प. वीश्वास आप्पा कोळेकर (नादंल) या कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहेत.
शनिवार, दि. ०३/०८/२०२४ रोजी सकाळी ८ ते ११ दिंडी प्रदक्षिणा, प्रदक्षिणा झाल्यानंतर काल्याचे कीर्तन व कीर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!