दैनिक स्थैर्य | दि. २५ मार्च २०२४ | फलटण |
ह.भ.प. युवक मित्र बंडातात्या कराडकर व ह. भ. प. सुरेश महाराज सूळ यांच्या मार्गदर्शनाने दुधेबावी (ता. फलटण) येथे शुक्रवार दि. २९/०३/२०२४ ते सोमवार दि. १/०४/२०२४ पर्यंत १३ कोटी सामुदायिक “राम कृष्ण हरी जप” संकल्प पूर्तीनिमित्त अखंड हरिनाम चतुर्थदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कीर्तन महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा, ६ ते ६.३० विष्णुसहस्रनाम, ६.३० ते ७ सामुदायिक जप, ७ ते १० गाथा पारायण, १० ते ११.३० गाथा भजन, दुपारी ३ ते ५ गाथा पारायण, सायं. ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, सायं ७ ते ९ हरी कीर्तन.
दररोज प्रवचन सेवा ह.भ.प. युवक मित्र बंडातात्या कराडकर (विषय – शांती ब्रह्म एकनाथ महाराज चरित्र) तसेच निळोबाराय गाथा पारायण नेतृत्व ह. भ. प. दीपक महाराज भोईटे हे करणार आहेत.
शुक्रवार, दि. २९/०३/२०२४ रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक (आळंदी) यांची कीर्तन सेवा. शनिवार, दि.३०/०३/२०२४ ह.भ.प. सुरेश महाराज सूळ (जानाई गुरूकुल, अकलूज) यांची कीर्तन सेवा. रविवार, दि. ३१/०३/२०२४ रोजी ह.भ.प. देवराम महाराज (आळंदी) यांची कीर्तन सेवा होणार आहे.
सोमवार, दि. ०१/०३/२०२४ रोजी सकाळी ९ ते ११ वाजता ह.भ.प. युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. तरी सर्व धर्म धर्मानुरागी भाविक भक्तांनी या कीर्तन महोत्सवात सहभागी होऊन कीर्तन सेवेचा आनंद घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ मंडळ दुधेबावी तसेच फलटण तालुका युवा वारकरी संघ यांनी केले आहे.