दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२५ | फलटण |
अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी शेकडो महिलांनी ग्रामीण पोलीस स्टेशन फलटणला तक्रार दाखल करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई पोलीस अधिकारी करत नाहीत. पोलीस अजित मल्टीस्टेटच्या भ्रष्टाचाराची एकप्रकारे पाठराखणच करत असल्याची भावना महिलांमध्ये निर्माण झाल्याने दि. २६ जानेवारीपासून या महिलांसह उपोषण करणार असल्याचे पत्र फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला भाजपाचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी दिले आहे.
वास्तविक पाहता फलटणमध्ये पार पाडलेल्या जनता दरबारमध्ये हा प्रश्न मांडूनसुद्धा अधिकारी न्याय देत नसतील तर न्यायमार्गाने उपोषणाचा व आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून यामध्ये महिलांना काही झाल्यास अथवा कोणतीही घटना घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस अधिकार्यांची राहील, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये अनुप शहा यांनी म्हटले आहे.
हे निवेदन देताना मोठ्या संख्येने महिला ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या.