इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…धनंजय मुंडेप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि २५: ”धनंजय मुंडेंना करूना शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नयेत, मग इतराच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर, विषय खूप व लांब जाईल. आतापर्यंत कोणी काय लपवाछपवी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही विरोधकांकडूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ” विरोधकांचे काम टीका करणे असले तरी पण ती कोणत्या पातळीपर्यंत करावी? यालाही मर्यादा आहेत. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हत, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, पण सांगायलाच हव्यात का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

शेतकरी आंदोलनासाठी जिल्हास्तरांवर कोरोनामुळे गर्दी नको. तालुकास्तरावर आंदोलनं करता आले असते. शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी आम्ही महाराष्ट्रात करतच नाही. केंद्र सरकार नवीन निर्णय जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत काही करण्याची गरज नाही अशी भूमिका आहे. एकीकडे आम्हीच नियमवामली करायची आणि आम्हीच गर्दी करायची हे बरोबर नाही, तरीपण गर्दी झाली. मुंबईऐवजी चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलने झाली असती तर ते बरे झाले असते,पण आंदोलनाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.


Back to top button
Don`t copy text!