अजित पवारांच्या शेजा-याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांचा नामोल्लेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पुणे, दि.२० : राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजा-याने आत्महत्या केली आहे. मात्र
आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं असल्याने खळबळ माजली आहे. मृत
व्यक्तीच्या मुलाने या संदर्भात बारामती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली आहे तर अद्याप ३ जण फरार आहे.

व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या
केली, परंतु त्यांनी सुसाईड नोटमध्ये अवैध सावकारीवरुन काहीजण पैशांसाठी छळ
करत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं व्यापाराने
सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. व्यापारी प्रीतम शहा यांच्या मुलाच्या
तक्रारीवरुन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला आहे.

प्रीतम शहा यांच्या मुलाने दिलेल्या
तक्रारीत म्हटलं आहे की, नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय
काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी उर्फ सुनील आवळे,
संघर्ष गव्हाले, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण
बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत, बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी
संबंधित आहेत. आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे
संचालकांचा समावेश आहे.

भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपा आमदार अतुल
भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जो निकष
लावून अर्णब गोस्वामी यांना अटक केली, तोच निकष लावून आता या राष्ट्रवादी
काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करा, झेपेल काय? असा सवाल भातखळकरांनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!