ब्रेकींग
अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता..
रामराजे निंबाळकर
प्रफुल्ल पटेल हे सुत्रधार— Rahul Kulkarni (@RahulAsks) July 3, 2023
दैनिक स्थैर्य | दि. 3 जुलै 2023 | मुंबई | कालच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेले अजितदादा पवार हे आगामी काळामध्ये मुख्यमंत्री होणारा असून अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल हे सूत्रधार आहेत; असे ट्विट राज्यातील प्रसिद्ध पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी केले आहे यामुळे विविध चर्चांना उदान आलेले आहे. येत्या काही दिवसामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार करण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर अजितदादा पवार हे मुख्यमंत्री झाले तर याचे सूत्रधार हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व खासदार प्रफ्फुल पटेल असतील; यावर शिक्कामोर्तब होईल.
कालच सुमारे एका वर्षानंतर राज्यामध्ये सत्ता संघर्षाचा पुढील अंक प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील काही आमदार घेऊन अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. यावेळी झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बहुतांश ज्येष्ठ नेते हे अजितदादा पवार यांच्यासोबत दिसत आहेत. सातारा जिल्ह्याचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे काल शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते.
त्यानंतर सोशल मीडियावर नूतन उपमुख्यमंत्री व नूतनमंत्र्यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली आहे. त्यामध्येच आता अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व प्रफुल्ल पटेल हे सूत्रधार असल्याची ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.