दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । मुंबई । नवनिर्वाचित सदस्य डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.