अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आ. शिवेंद्रसिंहराजे; मिलमधील पहिल्या रोलरचे पूजन तर, नवीन गोडाऊनचे भूमीपूजन

स्थैर्य, सातारा, दि. ०३ : ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. नेहमीप्रमाणे उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवत अजिंक्यतारा कारखाना होवू घातलेल्या हंगामात गाळपास येणार्‍या ऊसाला किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द आहे, असे आश्‍वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामुग्री देखभाल इत्यादी कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामाची पूर्व तयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील पहिल्या रोलरचे पूजन व नविन साखर गोडाऊनचे भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास रामचंद्र शेडगे, जेष्ठ संचालक रामचंद्र रंगराव जगदाळे, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कामगार-कर्मचारी उपस्थित होते.

मागील वर्षी भरपूर प्रमाणात झालेल्या पावसामुळे ऊसाचे क्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याने या हंगामाकरिता एकूण ७,००० हेक्टसर्र् ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. त्यामधून सुमारे ६.२५ लक्ष ते ६.५० लक्ष मे.टन ऊस गाळपास उपलब्ध होईल. या हंगामाकरिता शेती विभागामार्यत आवश्यक तेवढे ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झालेले आहेत. या हंगामात उच्चतम साखर उतारा व कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त साखरेचे उत्पादन घेणे तसेच उपपदार्थांच्या उत्पादनावर भर द्यावा लागणार आहे. कारखान्याकडे साखर साठवणुकीसाठी पक्के बांधकाम असलेले पाच गोडाऊन्स् असून त्यांची साखर साठवणूक क्षमता ४.८० लक्ष क्विंटल आहे. दरवर्षीचे हंगामात ७.०० ते ७.५०  लक्ष क्विंटल साखरेचे उत्पादन होत असून साधारणत २.०० लक्ष क्विंटल साखर ओपन स्पेसमध्ये ठेवावी लागते. यावर कायम स्वरूपी तोडगा म्हणून कारखान्याचे व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार १.५० लक्ष क्विंटल साखर साठवणूक क्षमतेचे दोन गोडाऊन्स बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचेही काम सुरु झाले आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

गाळपाची तांत्रीक कार्यक्षमता वाढविण्याकरिता कारखाना मशिनरीचे मॉडिफेकेशनचे काम सुरू करण्यात आले असून त्यामुळे ऊस गाळप क्षमता वापर वाढण्यास व रिकव्हरी वाढण्यास मदत होणार आहे. मागील सन २०१९-२०२० चे गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न करून १००% एफआरपी रक्कम शेतकर्‍यांना वेळेत आदा केली. तत्पूर्वीचे सन २०१८-२०१९ चे हंगामातील ऊसाचे एफआरपी प्रमाणे पेमेंट वेळेतच आदा केले होते. गाळपास आलेल्या ऊसाचे संपूर्ण पेमेंट वेळेत आदा केले असल्यामुळे ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांमध्ये अजिंक्यतारा कारखान्याबाबत समाधान व्यक्त होत असून अजिंक्यतारा परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

मिल रोलरच्या पूजनप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सर्जेराव सावंत, विश्‍वास शेडगे आणि मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!