
दैनिक स्थैर्य । 8 जुलै 2025 । बारामती । बारामती येथील लक्षशिला अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष अजय ओमासे यांना अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभीजीत देवकाते पाटील यांनी आयोजित केली होती. या प्रसंगी ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते व मनसेचे राज्य उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर, भाजप राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, डॉ शशिकांत तरंगे,मारुतराव वणवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
लक्ष्यशिला फाउंडेशनने केलेल्या सामाजिक ,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थापक अध्यक्ष अजय शिवाजी ओमासे यांना अहिल्या रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराने आत्मविश्वास वाढला व यापुढेही जोमाने विद्यार्थ्यांसाठी व शिक्षणासाठी कार्यरत राहू असे अजय ओमासे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले