दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२१ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील चैतन्य आबाजी नाळे या कृषी दुताने फलटण तालुक्यातील विंचुर्णी गावात ग्रामीण जागरूकता कार्यक्रम २०२१-२०२२ अंतर्गत शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या गावातच राबविला जात आहे. विद्यार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शन करीत आहेत. या मध्ये जनावरांचे लसीकरण, माती परीक्षण, औषधांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी , बीजप्रक्रिया, खटव्यावस्थपण, एकात्मिक तन व्यवस्थापन, तसेच विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून रोग आणि किड कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिकद्वारे मार्गदर्शन केले जात आहे.
या प्रसंगी प्रवीण निंबाळकर, सुधीर निंबाळकर, चंद्रकांत निंबाळकर, भिमराव निंबाळकर, सूर्याजी निंबाळकर, पूनम निंबाळकर, सौ. वीणा निंबाळकर, सौ. निर्मला निंबाळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निवारण करण्यात आले.
या साठी त्याला डॉ. बी. टी. कोलगणे सर कार्यक्रम समन्वयक, डॉ. डी. के. काठमाले, डॉ. एम. एस. कांबळे कार्यक्रम अधिकारी रा. छ. शा. म. कृ. म. कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.