कृषी अँप्सबाबत कृषिकन्यांनी केले शेतकर्‍यांना मार्गदर्शन


दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । फलटण । फडतरवाडी ता. फलटण येथे फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रातील कृषी कन्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमांतर्गत कृषीविषयक अ‍ॅप्लीकेशनबाबत प्रात्यक्षिक दाखवून शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले आहे.

यावेळी कृषीकन्या अश्विनी महानवर, पायल नाळे, वैष्णवी चांदगुडे, निधी कोडपे, आविष्का शिंदे, प्रचिती कुदळे, सेजल दांगट यांनी अग्रोस्टार, अँग्री अँप्स, प्लॅन्टिक्स आदी मोबाइलमधील शेतीविषयक अ‍ॅप्लीकेशची शेतकर्‍यांना ओळख करून दिली तसेच याबाबत मार्गदर्शन केले.

या अ‍ॅपद्वारे बाजारभाव, कीटकनाशके व खते भाव, प्रगतशील शेतीची माहिती मिळून शेतीचे अर्थनियोजन करण्यासाठी कशी मदत होते याविषयी माहिती दिली.

कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नीतिषा पंडित, प्रा. सुरेश साळुंखे, यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.


Back to top button
Don`t copy text!