दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय फलटणच्या चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सांगवी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त कृषी मेळावा व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. यु. डी चव्हाण सर यांनी दैनंदिन आयुष्यात तृणधान्यांचे महत्व व ‘व्हॅल्यू अँडेड प्रॉडक्ट्स’ याविषयी मार्गदर्शन दिले. यानंतर प्रा. डॉ. जी. एस. धायगुडे सर यांनी उसाचे पाचट व्यवस्थापन व उत्पादन वाढ यावर मार्गदर्शन दिले. त्याचबरोबर प्रा. डॉ. जी. बी. अडसूळ सर यांनी तृणधान्यांचे प्रकार व त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन दिले.
सांगवी गावचे सरपंच श्री. संतोष मोरे, उपसरपंच सौ. शर्मिला जगताप, सांगवी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. महादेव कदम, सातारा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मॅनेजर रोकडे मॅडम, कार्यक्रम समन्व्यक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित मॅडम यावेळी उपस्थित होत्या.
कृषी महाविदयालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविदया महाविदयालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वामिल लाळगे सर व प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कुंभारकर अंकिता, भिसे अनुजा, चौधर पूजा, आगवणे प्रणिता, भामे ऋतुजा, शिंगाडे तनुजा यांनी हा कार्यक्रम राबविला.