दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी आसनगावातील शेतकर्यांना बीजप्रक्रिया करण्याचे नुकतेच प्रशिक्षण दिले.
कृषी उत्पादनात पीक संरक्षणास जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व बीज प्रक्रियेस आहे; परंतु बियाणे प्रक्रियेस जेवढे महत्त्व पीक संरक्षणामध्ये द्यावयास हवे, तेवढे दिले जात नाही. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यांमुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते, तर बियाणे प्रक्रियेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगांचे तसेच इतर जीवाणूंचे नियंत्रण सुरूवातीसच होते. उभ्या पिकात दिसणार्या बर्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे ‘रोगट बी’ उगवून आले की, त्यामधील रोगासाठी खात्रीशीर असा नियंत्रण उपाय राहत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता बीज प्रक्रिया करण्याचे महत्त्व शेतकर्यांना पटवून दिले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिषा पंडीत, प्रा. भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत शुभम मोरे, सिद्धांत फडतरे, विजय नाळे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.