कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांची निरगुडीत जिल्हा बँकेस भेट


स्थैर्य, फलटण, दि. 16 डिसेंबर : सासकल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्पअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पिक कर्ज याबद्दल माहिती सांगितली.
निरगुडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये कृषिदूतांनी भेट दिली. याठिकाणी त्यांनी अधिकार्‍यांकडून शेतीविषयक कर्ज व पिक कर्ज योजनेबद्दल माहिती घेऊन याविषयीची माहिती शेतकर्‍यांना माहिती सांगितली.
कार्यक्रमास बँकेचे व्यवस्थापक शिंदे, कृषी अधिकारी अक्षय लाळगे, मंगेश मुळीक, प्रशांत मोरे, महादेव गायकवाड,नितीन तांबे यांच्या उपस्थितीत होते. कृषिदूत तेजस शिंदे, सुमित शेवाळे, श्रीराज मांजरकर, प्रसाद मुळीक, गौरव भोसले, आदित्य पवार, स्वरूप चव्हाण, श्रेयश शिंगाडे यांनी हा उपक्रम राबवला.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू डी चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस.धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनलाभले.


Back to top button
Don`t copy text!