दैनिक स्थैर्य | दि. ३ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. शेतकर्यांसमवेत विविध विषयांवर प्रात्यक्षिक देत असताना गोठ्याची, जनावरांच्या निवार्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याची माहिती दिली.
पाडेगाव येथे श्री. सचिन सोनलकर यांच्या गोठ्यात कृषीदूतांनी गोठा स्वच्छ व निर्जंतुक करून योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले. यामधून गोठा स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. सर्व शेतकर्यांनी या पध्दतीने गोठा निर्जंतुक करावा, असा सल्ला कृषिदूतांनी दिला.
वारंवार साफसफाई आणि निर्जंतुकीकरण केल्याने आजार होऊ शकणार्या जंतूंचा प्रसार रोखण्यास मदत होते. जनावरांना आजारी व रोगमुक्त ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ सचिन सोनलकर, बंडा सोनलकर, दत्तात्रय धायगुडे, पियूष पांडूळे, बाळासाहेब माने, रमेश धायगुडे, बाळू ठोंबरे, सुहास माने, हरिश्चंद्र माने, भगवान माने, महेश माने आदी शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर लाळगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत इंगोले धनंजय, केसकर राहुल, कांबळे रोहन, काटकर सौरभ, रनवरे शिवतेज, धुमाळ श्रीजीत, गोडसे आदित्य यांनी प्रात्यक्षिक पार पाडले.