संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ देण्यासाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । मुंबई । संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अनाथांपर्यंत पोहोचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन शासनाकडून कोणतेही अनुदान वा आर्थिक लाभ घेणार नसून, केवळ सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन संस्था काम करणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

दि. १० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती अनाथांना देणे व योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे यासाठी तर्पण फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेसोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग यांनी त्रिपक्षीय करारनामा करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ अनाथांपर्यंत पोहोचविण्यासाठी तर्पण फाऊंडेशन शासनाकडून कोणतेही अनुदान वा आर्थिक लाभ घेणार नसून, केवळ सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन संस्था काम करणार आहे. या संस्थेसोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग यांचेमार्फत त्रिपक्षीय करारनामा होणार असून सदर करारनामा प्रथम ८ वर्षाकरीता असेल. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतील. संस्थेचे काम समाधानकारक असल्यास पुढील ७ वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ देऊ शकतील, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!