श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी

अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार; विविध विषयांवर होणार चर्चा


स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक सहकारी संस्था मर्यादित, फलटण यांची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, कोळकी येथील सभागृहात संपन्न होणार आहे.

संस्थेचे व्यवस्थापक विश्वास जयवंत परकाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, या सभेमध्ये संस्थेच्या कामकाजाचा आणि २०२४-२५ सालच्या आर्थिक अहवालाचा आढावा घेतला जाईल. तसेच, मागील वर्षाच्या नफा-तोटा पत्रकास व ताळेबंदास मंजुरी देणे, आगामी वर्षासाठीच्या (२०२५-२६) अंदाजपत्रकास मान्यता देणे, संस्थेसाठी नवीन इमारत व गोदाम बांधकामावर विचार करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.

संस्थेच्या सर्व सभासदांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!