दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । सातारा । बगलबच्यांच्या नावावर हजारो एकर जमिनी खरेदी करून त्यातून मलिदा छापायचा म्हणूनच म्हसवड एमआयडीसी स्थलांतरित झाल्याची राजकीय आवई उठवली जात आहे . मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हसवड एमआयडीसी च्या स्थलांतरणाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रामराजे आता उतार वयात स्वतःची फजिती करून घेऊ नये, अतिताणामुळे त्यांच्या बुद्धीवर परिणाम झाला आहे असा खवचट टोला माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
दिल्ली बेंगलोर कॉरिडोरच्या निमित्ताने विकसित होऊ घातलेल्या म्हसवड एमआयडीसीच्या प्रश्नावरून सध्या जिल्ह्याच्या पूर्व भागात राजकीय रणकंदन सुरू आहे त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी बोलताना ते म्हणाले, म्हसवड येथे एमआयडीसी मंजूर झाली असून त्याच्या अध्यादेशाद्वारे जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे . असे असताना नांदवळ पिंपोडे येथे ही एमआयडीसी नेण्याचा घाट काही जणांनी घातला आहे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भामध्ये हालचाली सुरू केले आहेत मात्र अशी कोणतीही परिस्थिती नाही उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकरी हे शेतकरी असून त्यांची एमआयडीसीसाठी जमीन हस्तांतरण करण्याची कोणतीही तयारी नाही जमीन अधिग्रहणाच्या नियमानुसार जर 70 टक्के शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरणाला परवानगी दिली तरच एमआयडीसी होऊ शकते उलट येथीलच शेतकऱ्यांनी मला फोन करून या संदर्भात मदत करण्यासाठी आवाहन केले आणि मी ठामपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे त्यांच्या परवानगीशिवाय कोरेगाव तालुक्यातील एक इंच सुद्धा जमीन एमआयडीसीसाठी जाऊ देणार नाही म्हसवड एमआयडीसी आहे त्याच ठिकाणी होणार शासकीय अध्यादेश आणि जमीन अधिग्रहण या संदर्भात प्रक्रिया सुरू झाल्याने संबंधितांची पोटदुखी वाढली असून त्यांनी म्हसवड एमआयडीसी स्थलांतरित झाल्याची आवई त्यांनी उठवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसवड एमआयडीसी प्रस्तावित जागीच होणार असे स्पष्ट केले आहे मात्र औद्योगिक केंद्रीय समितीला रामराजे नाईक निंबाळकर व तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. म्हसवड एमआयडीसी मध्ये जागा पाणी रस्ते यांच्या प्रचंड त्रुटी असल्याचे असे सांगून त्यांनी समितीची दिशाभूल केली आहे शेखर सिंह हे आयएस दर्जाचे अधिकारी असून त्यांना अशी खोटी माहिती देणे शोभत नाही करोनाच्या काळामध्ये त्यांनी साहित्य खरेदीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये वेगळ्या मार्गाने कमावले म्हसवड एमआयडीसीच्या मध्यावरून महामार्ग जात असताना आणि तेथे जिहे कटापूरचे पाणी पोहोचलेले असताना रामराजे यांनी विनाकारण खोटा प्रचार केला . यांचे वय झाल्याने त्यांच्या बुद्धीने काम करायचे बंद केले आहे त्यामुळे त्यांनी उतार वयात फजिती होऊन देऊ नये सातारा जिल्ह्याला आपण भरपूर त्रास दिला आता यापुढे आपल्याला सोसायची सातारा जिल्ह्याची अजिबात तयारी नाही असा टोला जयकुमार गोरे ने लगावला.
कोरेगाव साठी स्वतंत्र एमआयडीसी करण्यासाठी येथील आमदार सक्षम आहेत उत्तर कोरेगाव मधील शेतकऱ्यांनी मागणी केली त्या संदर्भात तेथेही किंवा सातारा जिल्ह्यातील कोणत्याही भागात विकास कामांचे मोठे प्रकल्प येणार असेल तर आपण संपूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहोत असे स्पष्ट आश्वासन गोरे यांनी दिले काही राजकीय मंडळींना बगलबच्यांच्या द्वारे जमिनी खरेदी करून तिथून कोट्यावधी रुपये कमवायचे आहेत म्हणूनच असे खोटे अपप्रचार किंवा षडयंत्र करून मला कोंडीत पकडण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात मात्र माझ्यावरील अथवा माझ्या तालुक्यावरील कोणतेही षडयंत्र मी आज पर्यंत गेल्या पंधरा वर्षात यशस्वी होऊ दिले नाही ते राजे आहेत मात्र मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी मी सक्षम असून रामराजे यांनी शांतपणे घरी बसावे आता जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना रामराजेंना दिला.