रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२ : भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटीकल कंपनी डॉ. रेड्डीजवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामुळे कंपनीने जगभरातील कारखान्यांमधील काम थांबविले आहे. कंपनीचा डेटा धोक्यात असल्याने सर्व्हरमधील माहिती हल्लेखोरांना न मिळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पुन्हा काम सुरु होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुस-या आणि तिस-या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. या नंतर हा सायबर हल्ला झाल्याने य़ा दृष्टीनेही पाहिले जात आहे. हा सायबर हल्ला झाल्यानंतर बीएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली.

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, सायबर हल्ला झाल्याने कंपनीने सर्व डेटा सेंटर आयसोलेट केले आहेत. डॉ. रेड्डीजचे भारत, रशिया, ब्रिटन, अमेरिकेसह ब्राझीलमध्ये कारखाने आहेत. कंपनीवर हा सायबर हल्ला बुधवारी रात्री 2.30 वाजता झाला आहे.

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश राठी म्हणाले की, “सायबर हल्ला झाल्यामुळे, आम्ही आवश्यक माहिती बचाव कार्य म्हणून सर्व डेटा सेंटर वेगळे केले आहेत. आम्हाला आशा आहे की पुढील 24 तासांमध्ये सर्व सेवा सुरू होतील. या घटनेमुळे आमच्या कामावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!