सरकारी विमान प्रवासाची परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ११: राज्य सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‘स्पाइसजेट’ कंपनीच्या खासगी विमानाने उत्तराखंडकडे रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी जाणार होते. यासाठी ते सरकारी विमानाने निघाले होते. पण, राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना विमानात बसल्यावर परवानगी नाकारल्याचे कळाले. यानंतर राज्यपालांना राजभवनात परतावे लागले.

दरम्यान राज्य सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानी नाकारल्यानंतर ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद आता आखणी वाढण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपने राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यापालांसोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, सरकारकडून पोरखेळ सुरू

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल हे संविधानाने दिलेले सर्वोच्च पद आहे. अशा पदावरील माणसासोबत अशी वागणूक अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल विमानात बसेपर्यंत त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती सांगितली नाही, हे सरकारकडून जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. हे सरकार अहंकारी असून, राज्य सरकारकडून पोरखेळ सुरू आहे’, अशी टीका फडणवीस यांनी केली.

…तर जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने माफी मागण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारने माफी मागून हा विषय इथेच थांबवावा. तुम्ही राज्यपालांना विमानातून उतरवले, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल’, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही- प्रवीण दरेकर

या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेचे विरोदीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही. राजकारण आणि सूडभावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याची गरिमा राखयला हवी होती. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिले’, असे दरेकर म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!