अजित पवारांच्या सभेनंतर साखरवाडीत खासदार मोहिते पाटलांची सभा


दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सभा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की खासदार मोहिते पाटील काय बोलणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ साखरवाडी येथे जाहीर सभेमध्ये राजेगटासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षावर सडकून टीका केली होती. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेचे आयोजन साखरवाडी मध्ये करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साखरवाडी येथे संपन्न झालेल्या सभेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला होता. तरी आज होत असलेल्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला नक्की कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!