31 वर्षांनंतर दिला माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा


दैनिक स्थैर्य । 8 मे 2025। फलटण । तरडगाव (ता. फलटण) येथील वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या 1993-94 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

या स्नेहमेळाव्यास शिक्षक लोहार, मोहिते, ननावरे, मदने, सुनील क्षीरसागर, सस्ते, रवी भोसले, यादव, भिसे, ठोंबरे, श्रीमती शहा उपस्थित होते. या कार्यक्रमात दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तब्बल 31 वर्षांनंतर पुनः शालेय जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. गेट-टुगेदर म्हणजे आपापसात जिव्हाळ्याचे बंध घट्ट करणारा एक सोहळा होता.. या स्नेहमेळाव्यासाठी सहा महिने अगोदर तयारी केली. शाळेतील जुने विद्यार्थी ज्ञानेश्वर, आदेश, तुषार, संतोष, विक्रम, विलास, दीपक, सचिन, विजय यांच्यासह मुलींनीही ग्रुप वरुन व वैयक्तिक चर्चा करून स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

या स्नेहमेळाव्यास एकूण 76 माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध प्रकारचे गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आल होतेे. या वेळी शिक्षकव विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!