दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यातर्फे (MPSC) राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि गृह वविभागाच्या आस्थापनेवरील सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण पदे : ६६६
सहायक कक्ष अधिकारी : १००
राज्य कर निरीक्षक : १९०
आणि पोलीस उपनिरीक्षक : ३७६
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतेही तत्सम अहर्ता धारण केलेली असावी.
अधिकृत जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या अधिकृत वेबसाईट वर अपलोड केलेली आहे.
अधिकृत वेबसाइट:
www.mpsc.gov.in
इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष वाचून अर्जाच्या शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९. ११. २०२१.
अधिक माहितीसाठी आणि महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणाहून घरबसल्या फॉर्म भरण्यासाठी 8237131566 क्रमांकावर संपर्क करा