स्थैर्य, मुंबई, दि. २२: सध्या, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उद्योजकांपुढील सुरुवातीचे अ़डथळे कमी झाले आहेत. ते स्टार्टअपना उद्योगाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. उद्योगाभोवतीची पायाभूत सुविधा आणि वातावरण उभारण्याची चिंता त्यांना करावी लागत नाही. कदाचित यामुळेच, फॉर्च्युन बिझनेस इनसाइट्स स्टडीनुसार, एआय मार्केटची वाढ ३३.२ टक्क्यांच्या सीएजीआरवर होण्याची शक्यता आहे.
क्लाउड कंप्युटिंग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ब्लॉकेचन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका विशेषत: वित्तीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण आहे. कारण येथे ग्राहकांमधील तंत्रज्ञान आधारीत सोल्युशन्स अधिक पसंती मिळवत आहेत. डिजिटल स्टॉक ट्रेडिंग, रोबो अॅडव्हायजरीज, निओबँक आणि इतर सोल्युशन्सने तरुण लोकसंख्येला अधिक उत्पादक आणि जागरूक होण्यास मदत केली आहे. डिजिटल तंत्रज्ञानातील नव्या प्रवाहांनी नवं उद्योगांच्या प्रवेशातील अडथळे कसे दूर केले आहेत याबद्दल सविस्तर सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी.
एआय आधारीत बँकिंग: वित्तीय तंत्रज्ञानाने विस्तृत श्रेणीतील वापरासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) आणि एआयचे मिश्रण केले. यात बँकिंग सेवांचा समावेश केला. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीची ठिकाणं बिझनेससाठी खुली झाली. ही माहिती रचनाबद्ध आणि विस्कळीत अशा दोन्ही प्रकारची आहे. ही माहिती आणि त्यातून मिळालेले अंतर्ज्ञान बिझनेसकडून वापरली जाते व त्यातून ग्राहकांचे जास्त चांगले समाधान केले जाते. ही जमा केलेली माहिती आणि अंतर्ज्ञान यामुळे बिझनेसना ग्राहकापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते. स्मार्टफोन आणि त्यांच्या केवळ टच-ऑफ-बटन सुविधेमुळे रिअल टाइम डेटावर आधारीय उच्च दर्जाच्या वित्तीय सेवा पुरवणे शक्य झाले आहे. अशा प्रकारे फिनटेक फर्म्स त्यांच्या ग्राहकांना अधिक सक्षमतेने आणि तत्काळ सहाय्य करू शकतात. एआयद्वारे फिनटेक कंपन्यांना अधिक कार्यक्षम प्रक्रिया, अधिक चांगले वित्तीय विश्लेषण आणि वाढीव ग्राहक आकर्षण आदी अद्वितीय सुविधा प्रदान केल्या जातात.
क्लाउड कंप्युटिंग आणि फिनटेक: क्लाउड कंप्युटिंगद्वारे डेटा-इंटेन्सिव्ह सोल्युशन्सची सुविधा पुरवली जाते, त्यामुळे कंपन्यांना आणखी चांगला ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन ठेवत उपक्रम राबवता येतात. क्लाउड टेक्नोलॉजी ही स्वस्त तर आहेच, पण वापरास सोपी, सुरक्षित आहे. तसेच डेटा मॅनेजमेंट आणि प्रोसेसिंग अधिक सुलभ करते. उदा. नियम आधारीत गुंतवणूक इंजिन आज एक अब्जापेक्षा जास्त डेटा पॉइंट्सचे समांतर विश्लेषण करतात आणि त्यानंतर ग्राहकांना एखाद्या स्टॉकची शिफारस करतात. तसेच क्लाउड स्टोरेज सोल्युशन्सची तुलना करता, ऑन-प्रीमाइस डेटा स्टोरेज हा. क्लाउड स्टोरेज सोल्युशन्सच्या तुलनेत, प्रीमियम डेटा स्टोरेज हा उच्च भांडवलाचा असून यामुळे सर्व्हर मेंटेनन्स आणि अप टाइमची सुनिश्चिती यासाठी एकूण गुंतवणुकीच्या खर्चात वाढ होते. तथापि, क्लाउड कंप्युटिंग दृष्टीकोन स्वीकारून हा सर्व खर्च कमी करता येतो.
सोपे बूटस्ट्रॅपिंग: महाग इन्फ्रास्ट्रक्चर आणि एपीआय चलित सोल्युशन्स यामुळे स्टार्टअपसाठी बूटस्ट्रॅपिंग अधिक व्यवहार्य बनते. लघु उद्योगांना विस्तार करायचा असतो तेव्हा जास्त भांडवल लागते. तथापि, सध्याच्या तंत्रज्ञानाने, विस्तार करणे अधिक सोपे आणि प्रभावी करता येते. अगदी व्हेंचर कॅपिटलसारखे मोठे पाठबळ मिळाले नसतानाही, तंत्रज्ञान आधारीत दृष्टीकोनन ठेवल्यास वृद्धीसाठीचे भांडवल लघु उद्योगांना सहज उपलब्ध होते. अगदी त्यांच्याकडे पेटंट किंवा इतर इंटलेक्चुअल मालमत्ता नसली तरीही हे शक्य आहे. सास (SaaS), पास (PaaS), आणि आयएएएस (IaaS) यासारख्या ट्रेंडच्या उदयामुळे हे शक्य झाले आहे.
अगदी क्राउड फंडिंग हे देखील नव्या प्रकारचे वित्तीय मॉडेल आहे. अलीकडच्या वर्षात याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. क्राउड फंडिंगद्वारे स्टार्ट वेगाने मोठा निधी उभारू शकतात.
तंत्रज्ञानविषयक सोल्युशनच्या विकासापासून ते गुंतवणूकदाराचा आत्मविश्वास कमावण्यापर्यंत, ग्राहकांची सुलभता मिळेपर्यंत एआय, क्लाउड कंप्युटिंगसारखे तंत्रज्ञान बाजारावर सकारात्मक परिणाम करत आहे. हा प्रभाव केवळ उत्पादन विकासापर्यंत मर्यादित नाही तर एकूण मूल्य गतिमानतेपर्यंत त्याचा विस्तार आहे. उदा. आपण दिलेल्या तंत्रज्ञानाची विश्वासार्हता तसेच त्याची भविष्यातील व्यवहार्यता लक्षात घेता गुंतवणूकदार यात किती गुंतवणूक करतील, याचा कल एआय आणि क्लाउड कंप्युटिंगद्वारे दिला जातो.