ऍड. विश्वनाथ टाळकुटे यांची वकील संघास अनमोल मदत व मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

     सत्कारानंतर वकील संघात बोलताना ऍड. विश्वनाथ टाळकुटे समोर उपस्थित वकील वर्ग.

स्थैर्य, फलटण दि. १४ : मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या कामकाज पद्धतीद्वारे फलटणच्या नावलौकीकात सतत भर घालणारे अड. विश्वनाथ टाळकुटे यांनी फलटण वकील संघास लावलेला लळा अनमोल असून त्यातून त्यांनी केलेली मदत व मार्गदर्शन मौल्यवान असल्याचे प्रतिपादन वकील संघाचे अध्यक्ष अड. राहुल कर्णे यांनी केले.

    अड. विश्वनाथ टाळकुटे यांनी वकील संघास भेटी दाखल दिलेल्या वॉटर प्युरीफायर व कुलरचे उदघाटन त्यांचेच हस्ते वकील संघ कार्यालयात करण्यात आले, अध्यक्षस्थानी अड. राहुल कर्णे होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अड. राहुल बोराटे, सचिव अड. रणजित भोसले व अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

          करोना प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाज मागील तब्बल ८ महिने पूर्ण बंद असताना अड. टाळकुटे यांनी आपले वकील संघास सुमारे १ लाख ३ हजार रुपयांची देणगी विविध स्वरुपात उपलब्ध करुन देत केलेली मदत अविस्मरणीय आहे, त्यामुळे त्यांची आपले वकील संघाशी जोडली गेलेली नाळ अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट करीत वकील संघाचे अध्यक्ष अड. राहुल कर्णे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

     फलटण वकील संघ आपले कुटुंब असल्याची भावना जपणारे अड. टाळकुटे यांनी अडचणीत असणारे आपले सहकाऱ्यांना केलेली मदत प्रेरणादायी असल्याचे सांगून जन्मभूमीसाठी काम करताना त्यांनी वकील संघाप्रमाणे येथील संस्था, संघटना व व्यक्तींना केलेली मदत निश्चितच त्यांचे औदार्य व आपलेपण स्पष्ट करणारे असल्याचे अड. कर्णे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी अड. डी. जे. शिंदे, अड. एम. के. शेडगे यांची समयोचित भाषणे झाली.

     अड. टाळकुटे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच फलटण वकील संघाबद्दल असलेली आत्मीयता व येथील वकील वर्गाविषयी असलेली तळमळ व्यक्त करताना आपण अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन मेहनतीने उच्च न्यायालयात उत्तम कामकाजासाठी सतत प्रयत्न केल्याने वकील वर्गासमोरील आव्हाने, अडचणी व इतरांचे सहकार्य याविषयी पूर्ण जाणीव असल्याचे स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!