
स्थैर्य, फलटण दि.६ : मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.विश्वनाथ टाळकुटे यांनी फलटण न्यायालयाच्या आवारात वकीलांना उद्भवणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेवून या ठिकाणी सुमारे 31 हजार किंमतीचा ‘वॉटर प्युरिफायर व वॉटर कुलर’ देणगीदाखल दिला. याचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
कोरोनामुळे तब्बल आठ महिने न्यायालयाचे कामकाज बंद असताना अडचणीत आलेल्या फलटण वकील संघातील सदस्यांना अॅड.टाळकुटे यांनी सुमारे 47 हजार रुपयांची बहुमोल मदत केली होती. त्यानंतर वकील संघासाठी पुन्हा 25 हजार रुपयांचे देणगी त्यांनी दिली होती. आता 31 हजार रुपयाचा वॉटर प्युरिफायर दिला आहे. या भरघोस मदतीबद्दल फलटण वकील संघाच्यावतीने अॅड.विश्वनाथ टाळकुटे यांना सर्व पदाधिकारी व सदस्यांनी धन्यवाद दिले.