दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
प्रियदर्शिनी ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा, प्रख्यात कायदेपंडित कै. बॅरिस्टर राजाभाऊ सखाराम भोसले-पाटील यांच्या पत्नी व अॅड. रणजितसिंह राजाभाऊ भोसले-पाटील यांच्या मातोश्री अॅड. श्रीमती विजयमाला राजाभाऊ भोसले-पाटील यांचे उपचारादरम्यान मुंबई येथे दुःखद निधन झाले.
श्रीमती विजयमाला यांच्या पार्थिवावर शुक्रवारी वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.