दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अॅड. सविता रमेश यादव यांचा सहाय्यक सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) वर्ग १ पदी निवड झाल्याबद्दल व अॅड. डॉ. अशोक कृष्णा शिंदे यांची मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महामित्र पाक्षिक कार्यालयात सत्कार करण्यात आला.
अॅड. सविता रमेश यादव यांचा सत्कार व अभिनंदन ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे यांनी केले, तर अॅड. डॉ. अशोक कृष्णा शिंदे यांचा सत्कार व अभिनंदन क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले. तसेच अॅड. सूरज क्षीरसागर यांचा वाढदिवसानिमित्त यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास कोळकीचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, अॅड. श्रीरंग फुले, अॅड. सुनिल शिंदे, अॅड. राहुल कर्णे, अॅड. विशाल फरांदे, अॅड. राहुल बोराटे , अॅड. सूरज क्षीरसागर, अॅड. अमोल सस्ते, अॅड. रणजित भोसले, शिवलाल गावडे, शरदराव कोल्हे, प्रकाश फुले, संदिप नाळे, किरण फुले, दत्तात्रय शिंदे, शरदराव कोल्हे, अॅड. सुनील शिंदे आदी उपस्थित होते.