स्थैर्य, सातारा, दि.५: बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या चेअरमनपदी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व दिवाणी क्षेत्रातील नामांकित वकील अॅड. वसंतराव भोसले यांची एकमताने निवड झाली आहे. मार्च 2018मध्ये या कौन्सीलच्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांची सदस्यपदी निवड झाली होती. त्यानंतर नुकत्याच मासिक सभेत ही निवड करण्यात आली.
वसंतराव एकनाथ भोसले हे वेळू, ता. कोरेगाव, जि. सातारा या गावातून येवून सातारा जिल्हा न्यायालयात तसेच विविध तालुका न्यायालयामध्ये गेली सुमारे 32 वर्षांपासून दिवाणी व फौजदारी क्षेत्रामध्ये काम करत आलेले आहेत. सातारा जिल्हा न्यायालयात वकील संघटनेमध्ये कार्यरत राहून सदस्य, उपाध्यक्ष व अध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी यशस्वीरित्या वकीलांच्या हिताचे काम केलेले आहे. त्यांनी सन 2004-05 मध्ये सातारा जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष व 2011-12 मध्ये अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. पाच जिल्ह्यातील न्यायाधीश व वकील यांची मेडिएशन याविषयी कॉन्फरन्स अध्यक्ष या नात्याने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. तसेच वेळू गावामध्ये त्यांनी पाणी फाउंडेशनचे काम यशस्वीरित्या करून गावास 2016-17 मध्ये वॉटर कप मिळवून देण्यास मोलाचे कार्य सर्वांबरोबर केलेले आहे. वसंतराव एकनाथ भोसले यांनी वकीलांसाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम जिद्दीने केलेले असल्यामुळे वकीलांच्या आग्रहास्तव त्यांनी बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाची निवडणूक लढवली. त्यामध्ये महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांच्या सहकार्याने यश संपादन केले. त्यानंतर त्यांची अल्पावधीतच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे व्हाईस-चेअरमनपदी विनविरोध निवड झाली होती. या व्हाईस चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये अॅड. वसंतराव भोसले यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे व्हाईस चेअरमन म्हणून संघटनेचे उत्कृष्ट काम केले. त्याचीच पावती म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे सर्व सदस्यांनी दि.04 ऑक्टोबर रोजी औरंगावाद येथे बार कौन्सिलच्यासर्वसाधारण सभेत एकमताने अॅड. वसंतराव भोसले यांची चेअरमनपदी निवड केली.
या निवडीवददल त्यांचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार, खा. श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. सौ. सुप्रिया सुळे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ना. बाळासाहेव पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. महेश शिंदे, आ. मदन भोसले, माजी मंत्री शशिकांत शिंदे, नरेंद्र अण्णासाहेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, सातारचे नगरसेवक अशोकराव मोने, रहिमतपूरचे नगराध्यक्ष आनंदा कोरे, सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अरूण खोत, सातारा जिल्हा लॉ लायब्ररीचे चेअरमन नितीन मुके. अॅड. डी. एम. जगताप, अॅड. पांगे, अॅड. डी. आय. एस. मुल्ला, अॅड. काका पाटणकर, अॅड. डी. एस. पाटील, अॅड. नितीन वाडीकर, अॅड. शिवाजीराव मर्ढेकर, अॅड. डी. एम. चव्हाण, अॅड. चौधरी, अॅड. उत्तमराव गोळे, अॅड. सयाजीराव घाडगे, अॅड. जे. बी. यादव, अॅड. पन्हाळे, अॅड. बेगमपुरे, अॅड. व्ही. आर. वडदरे, अॅड. एस. एम. साखरे, अॅड. विजयराव कारंडे, अॅड. सुधीर गोवेकर, अॅड. प्रमोद शिंदे, अॅड. महेंद माने, अॅड. अजय डांगे, अॅड. अमरसिंह भोसले यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.