
स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : कोळकी येथील ज्येष्ठ विधीज्ञ, अॅड. धनंजय मारुतीराव क्षीरसागर (वय- 75) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
त्यांचे मागे 1 मुलगा, 3 मुली व पत्नी असा परिवार आहे.
अॅड. धनंजय क्षीरसागर यांनी फलटण व सातारा न्यायालयात यशस्वीरित्या 50 वर्षे प्रॅक्टिस केली.
सुरज धनंजय क्षीरसागर यांचे ते वडील होते.
त्यांच्यावर फलटण पंढरपूर रोडवरील कॅनॉल लगत, रावरामोशी पुलाजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

